शिवराज्याभिषेक दिन विशेष... <br /><br />कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील रणजीत घरपणकर यांनी घरातच अनोखे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर साकारले आहे. शिवकालीन शस्त्रांसह नव्वदहून अधिक गडकोटांवरील मृदा, गडकोटांची चारशेहून अधिक छायाचित्रे, पन्नास-साठ वर्षापूर्वीच्या विविध प्रकारच्या शिवमुर्ती, ओरिजनल शिवराई आणि अनेक दुर्मिळ शिवकालीन वस्तूंचा खजीनाच यानिमित्ताने एकवटला आहे. विशेष म्हणजे श्री.घरपणकर यांनी स्वतःच्या घराच्या दोन खोल्यांत सर्वांसाठी कायमस्वरूपी हा खजीना खुला ठेवला आहे. <br /><br />रिपोर्टर - संभाजी गंडमाळे